‘‘सोडून देतो माझं काम. पण जसे जन्म होत राहतात, तसेच मृत्यूही. मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार, अग्नि देणार? कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यानं काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही.’’ सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला.... कालिंदी म्हणाली, ‘‘तुम्ही योग्य तेच केलंत. आत्तापर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यात आलं. हीन वागणूक देण्यात आली. आता नदीपलीकडच्यांनीहीr मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं. मला नाही बोलावलं. ही एवढीशी होती शेवंता. जेव्हा हिला कावीळ झाली, वैद्यांकडून पानं, पुड्या रोज घेऊन जात होते. वैद्य त्या वस्तीत यायला तयार नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं. त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?’’ दाराआडून ऐकणारा गोिंवदा मात्र दुखावला. जो त्रास वर्गातली मुलं आपल्याला देतात, तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग त्यांच्याजवळ तक्रार ती काय करायची? ही कथा अंत्येष्टिविधी करणाNया दत्तूची, होरपळलेल्या गोिंवदाची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची, अपवित्राची!