प्राप्ती खरी नव्हे. हे लक्षात ठेवा. जे स्वत:ला शोधतात, त्यांनाच खरी प्राप्ती होते आणि जे इतरही काही शोधीत राहतात, त्यांचा हाती शेवटी अपयश आणि दु:खच येते. वासनेच्या मागे धावणारे लोक नष्ट झाले आहेत, नष्ट होत आहेत आणि नष्ट होतील. तो मार्ग आत्मनाशाचा होय.वासनेची तृप्ती कधीच होत नाही. तिच्या मागे जितके धावावे, तितकी अतृप्ती वाढतच जाते. जेव्हा व्यक्ती मागे वळून पाहते आणि स्वत:त प्रवेश करते, तेव्हाच ती वासनेतून मुक्त होऊ शकते.-ओशो