वेशीबाहेरच्या वस्त्यांना भेटी देऊन आणि बोलणी करून काढलेली ही चित्रे म्हणजे कल्पनेला डागण्या देणारे जगण्याचे दशावतरच होत. आपल्यासारखीच असलेली ही माणसं याप्रकारे आयुष्य काढतात याची कल्पनाही पांढरपेशा वाचकांना करता येणार नाही. ही चित्रे त्यांना दु:स्वप्नासारखीच वाटणार. आपल्याच देशातले हे अवमानित नागरिक आहेत यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. कल्याणकारी राज्यव्यवस्थेला जबर आव्हान देणारे हे जगणे आणि या वस्त्या आहेत. विमल मोरे यांनी धैर्याने आणि कळवळ्याने या जगात शिरून वावरून हे जे लेखन केले आहे ते मोलाचे आहे.