ताओवाद म्हणजे निसर्गाशी नातं सांगणारा विचार... निसर्गापासून दूर
जाणं म्हणजे संकटांच्या गावात जाणं आणि निसर्गाच्या हातात हात घालणं म्हणजे सुरक्षित आणि सुंदर जगणं... निसर्गाचं तत्त्वज्ञान डोक्यानं चालतं तर माणसाचं पायानं चालतं... हे सारं काही समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे पाचव्या बोटावर म्हणजेच करंगळीवर अवतरणारं किंवा तिलाच आकलन होणारं सत्य... हे मोठं मजेशीर, गंभीर आणि आनंददायीही...