उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Paatanjal Yogasutre By B K S Iyengar

Description

'पातंजल योगसूत्रे' हा महर्षी पतंजलींनी सिध्द केलेला भारतीय योगपरंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ होय. चार पादात विभागलेल्या या ग्रंथात अष्टांग योगसाधनेची सूत्रात्मक पध्दतीने समग्र मांडणी केलेली आहे.वायु पुराणात सूत्राची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी- 'स्वल्पाक्षरं असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम्..' अर्थात् कमीतकमी अक्षरे, मांडणीतील असंदिग्धता, विषयाच्या साराने संपृक्त असलेली रचना आणि अर्थाच्या प्रकटनासोबत अभ्यासकाला विषयविश्वाकडे अभिमुख करणे ही सूत्राची वैशिष्टये होत. व्याख्येत वर्णन केलेल्या सर्व गुणांनी 'पातंजल योगसूत्रे' मंडित आहेत.कोणत्याही टप्प्यावरच्या योगसाधकासाठी पातंजल योगसूत्रांचा अभ्यास आवश्यक असतो. साधनेतील प्रत्येक टप्प्यावर ही सूत्रे साधकासाठी नवा अर्थ घेऊन सामोरी येतात आणि साधकाची साधना अधिकाधिक सघन करत जातात हा या सूत्रांचा महत्त्वाचा विशेष आहे.गेली ऎंशी वर्षे योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार अप्रतिहतपणे योगसाधनेत गढलेले आहेत. त्यांच्या या दीर्घ साधनेतून त्यांना प्रतीत झालेला योगसूत्रांचा अन्वय या ग्रंथात त्यांनी अचूकपणे आणि सोप्या भाषेत योगसाधकांसाठी तसेच योगप्रेमींसाठी मांडलेला आहे.
नियमित किंमत
Rs. 200.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 200.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Paatanjal Yogasutre by B K S Iyengar
Paatanjal Yogasutre By B K S Iyengar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल