श्रीयुत रवीन्द्र केळेकर यांना आज ङ्ज्नपीठ' विजेते विचारवंत व साहित्यिक म्हणून भारतीय सारस्वताच्या मांदियाळीमध्ये ओळखले जाते.ओथांबे' हा त्यांचा चिंतनपर स्फुट लेखांचा संग्रह. हा संग्रह म्हणजे प्रेरक असे चिंतनशिल्प आहे. या पुस्तकातून आलेले लेखन हे केवळ दैनंदिनी नव्हे. निमित्त दैनंदिनीचे. मात्र त्यातून रवीन्द्रबाबांचे समाज-संस्कृतीविषयीचे चिंतनच प्रामुख्याने शब्दबद्ध झालेले आहे. त्याचे स्वरूप हे अनुभव, निरीक्षण, चिंतन यांची नोंद या स्वरूपाचे असून त्यासाठी त्यांनी निबंधसदृश फॉर्मची निवड केलेली आहे. ङङ्गओथांबे' वाचताना डाग हेम्मरशोल्डच्या 'चरीज्ञळपसी' ची आठवण येते. मनात आलेले विचार, सूक्ष्म भावना, जीवन आणि मरण याविषयीचे खोल चिंतन हेम्मरशोल्ड एकत्र करून ठेवत असे. त्याचप्रमाणे रवीन्द्रबाबांमधील चिंतक कवीच्या नजरेने त्या जगाकडे पाहतो आणि ज्या गोष्टी सामान्यपणे आपल्या नजरेला दिसत नाहीत त्या अचूक टिपतो.