इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस’च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. ‘ऑनलाइन शॉपिंग’ हा फंडा घराघरात पोचून ‘हिट’ झाला!भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे ‘आधुनिक कोलंबस’ म्हणजे ‘फ्लिपकार्ट’, ‘मेकमायट्रीप’, ‘कॅरटलेन’, ‘झोमॅटो’, ‘बिग बास्केट’, ‘शादी डॉट कॉम’, ‘इमेजेस बझार’ यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले.या ‘आयडॉल्स’ कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!