आयुष्याचा प्रवाह म्हणजे भावभावनांचं, नातेसंबंधांचं, मनातरुतलेल्या व निसटलेल्या काही क्षणांचं एक अजब मिश्रण!
स्त्रीचं भावविश्व हा असाच एक गहन विषय! ‘आलिया भोगासी’, ‘जड झाले ओझे’, ‘खरे सौंदर्य’ या कथांमधील नायिका कधी परिस्थितीच्या बळी ठरलेल्या, तर कधी नशिबाच्या फेर्यात अडकलेल्या. ‘प्रतारणा’, ‘अधुरी कहाणी’ या कथाही मानवी नात्यांवर भाष्य करणार्या. जगण्यातले छोटे-छोटे, वेधक प्रसंग वेचून गुंफलेला
हा कथासंग्रह - ‘ओढ अंतरीची’!