मराठवाड्यातील एक सर्वसामान्य हिंदू कुटुंबात जन्माला आलेली आणि निजामी राज्यात स्वकर्तृत्वाच्या जोरावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोचलेली पहिली व्यक्ती म्हणजे केशवराव कोरटकर. त्यांचे हे छोटेसे चरित्र. काशिनाथराव वैद्य या एका निकटवर्तीयाने लिहिलेले. १९३३ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिध्द केलेले... न्या. कोरटकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल लक्षात घेऊन मुद्दाम त्या चरित्राची ही नवी संपादित आवृत्ती. नरेन्द्र चपळगावकरांच्या विवेचक प्रस्तावनेसह...