न्यायाच्या या गोष्टी न्यायालयीन खटल्याच्या नेहमीच्या हकिकती नाहीत. रूढ अर्थाने लिहिल्या गेलेल्या त्या न्यायालयीन सत्यकथाही नव्हेत. या कथांचा जन्म मात्र न्यायव्यवस्थेतूनच झाला आहे.
न्यायव्यवस्थेत अडकलेल्या आणि न्यायाची अपेक्षा करणार्या पक्षकारांच्या आणि क्वचित न्यायाधीशांच्याही या गोष्टी आहेत. व्यवस्थेचे अपुरेपण अगर तिचा होणारा गैरवापर जसा यात दिसतो तसेच आपले माणूसपण जागे राखणार्या आणि व्यवस्थेपेक्षा न्यायाला महत्त्व देणारांचेही त्यात दर्शन होते. वकील आणि न्यायाधीश म्हणून केलेल्या कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या व समाजजीवनाचा डोळसपणे वेध घेणार्या एका ललित लेखकाचे हे निरीक्षण आहे.