षटक’, ‘बंद लिफ्ट’ आणि ‘ब्रदर फिक्सेशन’ या कथा क्रिकेटर्सच्या भावभावना उत्तमरीतीने चित्रित करतात. मी या कथा उत्सुकतेने वाचल्या आणि त्या मला मनोरंजक व उद्बोधक वाटल्या. लक्ष्मीकांत देशमुख आमची मने वाचू शकतात.”– सचिन तेंडुलकर, क्रिकेट“एक पुणेकर म्हणून लक्ष्मीकांत देशमुखांनी आव्हान म्हणून तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे दर्जेदार बांधकाम शिवछत्रपती क्रीडा नगरी, पुणे येथे केले. या पुस्तकातील ‘रन बेबी रन’ आणि ‘फिरुनी जन्मेन मी’ या खेळाडूंच्या जीवनावरील कथा मी अधिक रस घेऊन वाचल्या. प्रस्तुत पुस्तक हे सर्वांसाठी एक वाचनीय पुस्तक आहे हे निर्विवाद!”– धनराज पिल्ले, हॉकी