इ.स. १९०१ पासून दरवर्षी जाहीर करण्यात येणारा ‘नोबेल पुरस्कार’ हा जगातील सर्वोच्च सन्मान होय. आतापर्यंत हा पुरस्कार जगातील जवळपास ९०४ प्रतिभाशाली व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्यापैकी स्त्रियांची संख्या ५१ आहे. यातील ३० स्त्रियांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.यशाचे सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्या महिलांनी ध्यास व अविरत साधनेद्वारे मिळविलेल्या यशाचे रहस्य जाणून घेणे, त्यांचे काम समजून घेणे व त्यापासून प्रेरणा घेणे, ही आकांक्षा कुणाला असणार नाही? साहित्य, विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि विश्वशांतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या या तेजस्विनींच्या कार्यकर्तृत्वाला हा ग्रंथरूपी मानाचा मुजरा!