बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक. नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टक-यापर्यंत सा-यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, असा कलमबहाद्दर. बाबूरावांचं चरित्र, महेश एलकुंचवारांची प्रस्तावना, अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख, बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंब-या अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंब-यांच्या या बादशहाला मानाचा मुजराच! निवडक बाबूराव अर्नाळकर