'‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वालाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये - डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. ‘वर्क फ्रॉम होमच्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर! गिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटरचे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!'