भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या थोर राष्ट्रभक्तांनी आपले जीवन – सर्वस्व वेचले त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रक्रमाने येते. कुशाग्र बुद्धीचे, धडाडीचे व शूर सुभाषबाबू! इंग्रज सार्वभौमत्वाला त्यांनी हादरे दिले. आपल्या सैन्यदलात पुरुषांची ‘आझाद हिंद सेना’ आणि स्त्रियांची ‘झाशीची राणी रेजिमेंट’ ची स्थापना करून अनेक देशांचे पाठबळ मिळवले व स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी दिलेला ‘जयहिंद’चा नारा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्याय भारताच्या या महान क्रांतिकारकाचे बालपण ते स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हा प्रवास प्रस्तुत पुस्तकाद्वारे गोष्टींच्या स्वरूपातून मांडण्यात आला आहे. सुभाषबाबूंच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन भावी काळात आदर्श नागरिक निर्माण व्हावेत या हेतूने लिहिलेले ‘सुभाषचंद्र बोस’ हे पुस्तक वाचकांना आवडेल, अशी आशा आहे.