उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Nenchim (नेनचिम) by Narayan Dharap

Description

नेनचिम्वर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणु काही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो… सूर्यांच्या तेजाच्या, प्रखर उष्णतेच्या क्षेत्रात पोहोचतो. जणु काही उत्कंठेनेच त्याची गती वाढते… वाढते… विलक्षण वाढते. आपला झगझगता झेंडा मिरवीत तो जवळ येतो… आणखी जवळ येतो…पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी…
नियमित किंमत
Rs. 203.00
नियमित किंमत
Rs. 225.00
विक्री किंमत
Rs. 203.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Nenchim (नेनचिम) by Narayan Dharap
Nenchim (नेनचिम) by Narayan Dharap

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल