आजपर्यंत तत्त्वज्ञान, काव्य, भक्ती, कर्म इत्यादी अनेक अंगांनी ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर ग्रंथ लिहिले गेले. परंतु नाथसंप्रदायाचा प्रभाव स्पष्ट करणारा एकही ग्रंथ लिहिला गेला नाही. प्रस्तुत ग्रंथात श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यावर असलेला नाथसंप्रदायाचा प्रभाव स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्त्वज्ञान, साधना, काव्यशिल्प, समाजप्रबोधन अशा विविध अंगांनी हा प्रभाव स्पष्ट केला आहे. संतसाहित्याच्या व नाथसंप्रदायाच्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे.