पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विनोदबुद्धी. वाचकांना आपल्या विनोदांनी हसत-हसत अंतर्मुख करणे हे पु. लं. च्या विनोदाचे वैशिष्ट्य. हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा, आनंद मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. निखळ आनंद जगण्यासाठी मदत करीत असतो. पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर आपल्या विनोदांतून आपल्याला हसवत ठेवलं.याची प्रचिती ‘नस्ती उठाठेव’ पुस्तक वाचून येते. क्षणाक्षणाला हसवणारे खास पु. ल. शैलीतले ‘नस्ती उठाठेव’आजही वाचले तरी तितकेच ताजेतवाने वाटते.