‘सुरति’ म्हणजे स्मरणातलं सातत्य. मण्यांतल्या धाग्यासारखं. तुम्ही संसारात सर्व काही करत रहा; पण परमात्म्याचं स्मरण ठेवा. उठा, बसा, खा, काहीही करा; पण संसारातून पळून जाऊ नका. पळून गेल्याने काहीही होत नाही. संसाराच्या जाळ्यातच त्याचं स्मरण हवं. लोक संसार सोडून जंगलात, हिमालयात जाऊन बसतात आणि तिथे त्यांना त्यांचा संसार आठवत राहतो. लहान मुलं दगड-धोंडे गोळा करतात. तुम्ही त्यांना म्हणता, ‘काय हा वेडेपणा?’ पण मग तुम्ही तरी दुसरं काय करत आहात? तुम्ही वेगळं काय गोळा करत आहात?