ओम्कार हे नाव परमात्म्याचं आहे. कारण जेव्हा सर्व शब्द हरवतात, तेव्हा चित्त शून्य होतं. तेव्हा लाटा मागे पडतात, तेव्हा मनुष्य सागरात तल्लीन, एकरूप होतो, तेव्हाही ओम्काराचा ध्वनी ऐवू येतो. तो आपण निर्माण केलेला ध्वनी नाही आहे. तो ध्वनी आहे अस्तित्वाचा. अस्तित्व असण्याचा ढंग ओम्कार आहे. कुणा मनुष्याने दिलेलं नाव नाही. म्हणूनच ओम्कारचा काही अर्थ नाही. त्याचा कुणी निर्माता नाही. अस्तित्वाची लय – ओम्कार!