समाधीतले सिद्ध आणि ध्यानातले साधू गात आहेत. यती, सती, संतोषी, महान, शूरवीर गात आहेत. पंडित, विद्वान, ऋषीश्वर आणि त्यांचे वेद युगानुयुगे तुलाच गात आहेत. स्वर्गापासून पाताळापर्यंत तुझ्या गाण्याव्यतिरिक्त अजून कुठलेही स्वर नाहीत. हे अस्तित्व म्हणजे एक उत्सव आहे... जर तुम्ही कुणाला नाचताना बघाल, तर त्याला फुलं वाहून या. पण असं कुणी करत नाही. तसं केलं असतं, तर जगातले आश्रम, मठ यांचं स्वरूप बदलून गेलं असतं. तिथे उत्सव असता. गाणी, नृत्य असतं. एक महाकाव्य असतं निरंतर!