'आमच्या वाडवडलांच्या हाती पाटी-पुस्तक आले नाही, परंतु त्यांच्याकडे जन्मजात शहाणीव होती. गरिबी होती, लाचारी नव्हती. दैन्य होते, दारिद्र्य नव्हते. संघर्ष होते, वैर नव्हते. अंधश्रद्धा होती, अमानुषता नव्हती. जीवनाने कधी क्रूर थट्टा केली, तरी त्यांनी प्राणपणाने श्रद्धेच्या वातीचे रक्षण केले आणि श्रद्धेने त्यांना तारले. श्रद्धेसाठी ते ‘भावरत असा शब्दप्रयोग करीत. पिढ्यान् पिढ्यांचा ‘भावरताचा वारसा जपणारे स्फटिकासारखे स्वच्छ, पाण्यासारखे प्रवाही, निसर्गासारखे निर्मळ आत्मकथन.