उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Na Sangnyajogi Goshta By Major General Shashikant Pitre

Description

१९६२ साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारुण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली. म्हणून ती ठरली ‘न सांगण्याजोगी गोष्ट’! तथापि आपली राष्ट्रीय संरक्षणसिद्धता वाढवायची असेल, तर 'त्या' पराभवाची परखड कारणमीमांसाही करायलाच हवी. 'त्या' शोकांतिकेला कोणकोण जबाबदार होते? चीनवर नको तेवढा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते? की राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी? त्या युध्दात नेमके काय घडले, कसे घडले आणि का घडले? 'त्या' पराभवाला एखाददुसरी तरी रुपेरी कडा होती का? या आणि अशा इतरही असंख्य प्रश्नांची साधार, तपशीलवार उत्तरे देणारा हा ग्रंथ म्हणजे युध्दशास्त्रविषयक मराठी साहित्यात मोलाची भर आहे. प्रत्यक्ष रणक्षेत्राची व व्यूहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय आहे. एका रणझुंजार सेनानीने इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला हा ग्रंथ देशहिताबद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा... 
नियमित किंमत
Rs. 375.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 375.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Na Sangnyajogi Goshta by Major General Shashikant Pitre
Na Sangnyajogi Goshta By Major General Shashikant Pitre

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल