प्रस्तुत पुस्तकात श्री. धनंजय चिंचोलीकर यांनी अप्रत्यक्ष भेटीत घेतलेल्या माजी पंतप्रधान मा. अटलजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, अमिताभ ब?न, नाना पाटेकर, ओसामा बिन लादेन, जनरल मुशर्रफ, सद्दाम हुसेन पासून माधुरी दीक्षित, सुरेखा पुणेकर पर्यंत सतरा मुलाखती आहेत. ह्या मुलाखती थेटपणे घेतलेल्या नाहीत हे खरे असले तरी असे छातीठोकपणे कोणाला सांगता येणार नाही. ङङ्गवास्तव आणि वास्तवाला थेट छेद न देणारी अतिशयो?ती यांचं मिश्रण म्हणजे नमुलाखत' हे लेखकाचं म्हणणं किती यथार्थ आहे, ह्याची प्रचिती ह्या मुलाखती वाचताना वाचकांना येईल. अप्रत्यक्ष भेटीत नमुलाखत घेण्यासाठी एक गूढश?ती लागते, ती परकायाप्रवेशाची. येथे परकायाप्रवेशाची गूढश?ती प्रातिभ आहे. ह्या प्रातिभ श?तीमुळेच कोंबडा, कुत्रा, बैल हेही बोलते झाले आहेत. विशेष सूचना : ह्या नमुलाखती करमणूक म्हणूनच घ्याव्यात, त्याकडे विनोदाच्या दृष्टीने पाहिले जावे. हसू आले नाही तर राग-राग करू नये, राग आला तर तो हसण्यावरी न्यावा ही अपेक्षा. शेवटी ङङ्गङङ्गत्यांनी'' असे म्हटलेच नाही, हा खुलासा आहेच.