मुलांना वळण लावणे हे फारच जोखमीचे काम आहे. या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही ते सहजपणे करू शकाल. लहानांवर जबाबदारी सोपवली की, त्यांना आपण मोठे झाल्याचा केवढा आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात सोपवलेली जबाबदारी पार पाडतात, अगदी चुटकीसरशी. पुढाकार घेण्यात ती जशी ‘मोठी’ आहेत, तशीच सांगितलेले ऐकण्याइतपत ती ‘लहान’ही आहेत. म्हणून त्यांच्यात मूल्ये रुजवण्यासाठी हाच काळ योग्य आहे. या काळात मुले तुम्हाला खूप खूप प्रश्न विचारतील. जीवनमूल्यांच्या संदर्भात त्यांना जाणते आणि बोलते करण्यासाठी या पुस्तकाचा तुम्हाला छान उपयोग होईल.