कशी आहे बुवा ही अमेरिका?.... कोणत्याही देशात थोडया दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घवास्तव्यासाठी... त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला, तेथील शिस्त, रीतिरिवाज,पध्दती, तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पणत्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतो. त्या दृष्टीने डॉ. मोहन द्रविड यांनीत्यांच्या ४०- ४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशयसहजसुंदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवली आहे.
या पुस्तकात अमेरिकेचं काय चांगलं, काय वाईट याची चर्चा केली नसून लेखकाने अमेरिकेचीसर्वांगीण ओळख करून दिली आहे. अमेरिकेचा संक्षिप्त इतिहास, तिथलं राजकारण, दैनंदिनजीवन, समाज जीवन, लोकांची कामाची पध्दत, कुटुंबव्यवस्था, सणवार-सुट्टया, भाषा अशाअनेक पैलूंचा अंतर्भाव लेखकाने या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केला आहे.
आज भारतातून शिक्षणासाठी, नोकरी-व्यवसायासाठी, पर्यटनासाठी किंवा आपल्या पाल्यांनाअथवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा सर्वांसाठी एकसच्चा सोबती... मुक्काम पोस्ट अमेरिका !