‘मोडक्या आभाळाखालची माणसं’ हा प्रा. कोकजे यांचा व्यक्तिचित्रसंग्रह पारंपारिक व्यक्तिचित्र रेखाटन पद्धतीला छेद देणारा संग्रह आहे. माणसांच्या आयुष्यात येणारे एकाकीपण, आजूबाजूचा परिसर, कालसापेक्षता, परंपरानिष्ठता, गावातील एकत्र कुटुंबभाव, नकळत घडत जाणारे परिवर्तन, धार्मिकता, परोपकारी वृत्ती, स्वार्थीपणा, एवढ्यापुरतीच प्रा. कोकजे यांची व्यक्तिचित्रे मर्यादित नाहीत तर, काळाच्या अक्षांशाशी बांधलेली, कालसापेक्ष अशी आहेत. आपली समाजस्थिती व संस्कृती कसकशी परिवर्तन पावत गेली याचा अभ्यास करणार्यांना हा लेखसंग्रह उपयुक्त ठरेलच पण ही ‘मोडक्या आभाळाखालची माणसं’ वाचकांनाही आपलीशी वाटतील.