मिथक हिंदू पुराणकथांबद्दल उपयुक्त माहिती देणारे पुस्तक या पुस्तकामधून आपल्याला हिंदू पुराणकथांचे आकलन होते. कित्येक पिढ्या चालत आलेल्या संस्करणानंतर घडलेल्या हिंदू पुराणकथा या आत्म्याच्या अंतरंगात डोक्यावरून पाहणार्या एका गवाक्षाचे काम करतात. आपल्याला सभोवतालच्या जगाचे आकलन करण्यास शिकवतात. पुस्तकाचा उद्देश पुराणकथांच्या पलीकडचा विचार करायला लावणे हा नसून, त्यांतील प्राचीन, चिरंतन आणि अद्यापही समर्पक असणार्या भाषेच्या वाचनाने समृद्ध आणि सक्षम होणे हा आहे. या पुस्तकात लेखकाने पौराणिक कथांतल्या विरोधाभासांवर भाष्य केले आहे.