अनातोली बाबाकोव्ह यांना रशियन तुरुंगातून सोडवण्याच्या प्रयत्नात असणारा नावाजलेला लेखक हॅरी क्लिफ्टन... बाबाकोव्ह यांच्या ’अंकल ज्यो’ या पुस्तकाची दुर्मिळ प्रत मिळवून, त्यातील रहस्य व सत्य जाणतो; पण ते पुस्तक जप्त केलं जातं व हॅरीला राजद्रोही म्हणून रशियन सरकार तुरुंगात टाकतं. बकिंग हॅम जहाजाच्या अतिरेकी कारवायांत हॅरीची पत्नी एमा कोर्ट कारवाईला, लेडी व्हर्जिनियाच्या षड्यंत्राला सामोरी जाते. मुलगा सेबॅस्टियनला फार्दिंग्ज बँकेच्या कार्यात वादळांना तोंड द्यावं लागतं. या सगळ्या गुंत्यातून हॅरी आणि त्याचे कुटुंबीय कसे बाहेर पडतात, याचं खास जेफ्री आर्चर स्टाइल चित्रण असणारी उत्कंठावर्धक कादंबरी.