कावेरी - विद्याधरपंत या दांपत्याची ही चित्तरकथा येथे ओघवत्या भाषेत रंगविली आहे. एकविसाव्या शतकात महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणार्या भारताचं सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन मात्र उद्ध्वस्तच होण्याच्या मार्गावर जात असल्याच्या खुणा जागोजागी दिसत आहेत. दिवसरात्र अर्थोत्पादन, अर्थसंचय या मार्गावर अनावर धावपळ वेगानं करणार्या आजच्या तरुण पिढीचं भावविश्व शबलित झालं आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि त्यांच्या समस्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्या प्रस्तुत कादंबरीत मुखर होतात आणि प्रभावीपणे व्यक्त होतात. हे ह्या कादंबरीचं मोठं यश आहे.