या कथा मध्यमवर्गीय जीवनजाणिवा रेखाटतात.
त्या माणसांचे नमुने, समाजजीवनात वावरताना
त्यांच्या कृती-उक्तीत पडलेले अंतर
यांवर नर्मविनोदी भाष्य करतात.
ही कथा ‘माणूस’ नावाच्या प्राण्याची मानसिकता
उत्तम रीतीने पकडते.
या कथाविषयांत विविधता आहे.
कौटुंबिक विषयांपासून ते राजकीय नेतृत्त्वापर्यंत
ही कथा ङ्गिरताना दिसते. माणसाच्या स्वभावाच्या
विविध छटा सूक्ष्म रीतीने टिपते.
त्यावर उपहासगर्भ भाष्य करते.
राजकारणी माणसाची लबाडी, आपमतलबीपणा
यांवर प्रकाश टाकते. त्यांचे खुमासदार वर्णन करते.
सध्याच्या वर्तमानकालीन परिस्थितीचे भेदक दर्शन घडवते.