मनोगती… म्हणजे मनाची गती…क्षणामध्ये आठवणींचे खंड पार करणारी…भविष्यातल्या भरार्या मारणारी…कधी वर्तमानाच्या आडोशाला बसणारी…वर कधी स्वतःमध्येच गिरक्या घेणारी.मनोगत म्हणजे मनातले विचार…आपल्या भावना आणि वर्तनालाआकार देणारे विचार.कधी विवेकाने वागणारे,तर कधी विनाशाकडे धावणारे…मनोगती म्हणजेमनोगतामध्ये, आत जाऊन घेतलेला वेध!विकाराकडून विकासाकडे नेणारा…आधुनिक मानसशास्त्र,प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान,तसेच महाराष्ट्राचा भागवत्धर्मह्यांचा समन्वय साधणारावैयक्तिक आणि सामाजिकमनोस्वास्थ्याचा उपयुक्त आलेख.अनुभवी मनोविकासतज्ज्ञाच्या अनुभवांचेआणि प्रत्यक्ष संवादसत्रांचे प्रभावी रेखाटन…मनोगती।