‘मंजिरी’... ‘तुळस-मंजिरी’... नाव उच्चारताच नजरेसमोर तरळते एक सात्विकता... तुळशीवृंदावनात बहरलेली तुळस बघितली की, मन शांत होतं... तिच्या पावित्र्यानं, साधेपणानं मन भारावून जातं... ...कथेची नायिका ‘जया’ ही या ‘मंजिरी’सारखीच... जिनं सदा प्रेमच दिलं. तळाखालच्या बाळकृष्णाला सावली दिली. पण स्वत:ची मर्यादा कधी ओलांडली नाही! आपल्या भावोत्कट लेखनीतून लेखिकीने स्त्री स्वभावाची अनेक गुण-वैशिष्ट्यं... मनोभावना... या कादंबरीत सहज-सुंदरतेने रेखाटली आहेत...