मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात!