मॅन ऑन मिशन महाराष्ट्रनागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर ते महाराष्ट्र राज्याचे १८वे मुख्यमंत्री अशी देदीप्यमान कारकीर्द असणारे मा. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे राजस, कुशल तसेच चाणाक्ष व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. त्यांच्या ठायी अभ्यासूवृत्ती, नेतृत्वगुण आणि माणसं जपण्याच्या हातोटीबरोबरच राजकारणात आवश्यक असणारा संयम तसेच योग्यवेळी गरजेची असणारी आक्रमकता या गुणांचा अचूक मिलाफ आहे.केवळ महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या फडणवीस सरकारने ग्रामीण भाग, शेती, नागरिकांचे आरोग्य, महिलांचा विकास आणि पायाभूत सुविधांची निर्मिती यांसह अनेक अभिनव संकल्पना साकारल्या आहेत.त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला वीजजोडणी अशा योजनांनी प्रत्यक्षात आकार घेतला. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना अडीचशे कोटींहून अधिक रुपयांची मदत प्राप्त झाली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा फायदाही लाखो रुग्णांना झाला.अशा या मुख्यमंत्र्यांविषयी आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी जाणून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न…