उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Malagudeecha Sannyasi Wagh By R K Narayan

Description

आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्‍याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!गावतल्या कोंबड्या-बक‍‍र्‍या-म्हशींची शिकार करून गावकर्‍यांना त्रास देणार्‍या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. या `हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या `सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात.या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते.`मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा...मालगुडीचा `संन्यासी’ वाघ!
नियमित किंमत
Rs. 160.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 160.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Malagudeecha Sannyasi Wagh by R K Narayan
Malagudeecha Sannyasi Wagh By R K Narayan

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल