उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Majya Vidyarthi Mitrano By Yashwantrav Chavan

Description

मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.
नियमित किंमत
Rs. 195.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 195.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Majya Vidyarthi Mitrano By Yashwantrav Chavan
Majya Vidyarthi Mitrano By Yashwantrav Chavan

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल