माणूस काय, प्राणी काय, पक्षी काय किंवा किडामुंगी काय, प्रत्येकाच्या स्वभावाचं त्याचं आपलं जग असतं; त्याचं आपलं जगणं असतं, त्याचे आपले आनंद असतात. त्याच्याच मग गोष्टी होतात. मजेदार. मनाला आवडणार्या मुलांना, मुलींना तर जास्त आवडणार्या मजेदार गोष्टीतली माहिती आणि मजा पालकांनाही प्रसन्न करणारी आहे. प्रा. सौ. लीला शिंदे हे बालकुमार साहित्यातलं सर्वांना परिचित आणि प्रिय असं नाव आहे. राज्य शासनाचे पुरस्कार आणि इतर संस्थांचे सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. साने गुरुजी बालसाहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलेलं आहे. ‘मजेदार गोष्टी’ हा बालकुमारांशी त्यांनी केलेला सुंदर संवाद आहे.