महिलांचे कायदे’ या पुस्तकात स्त्रियांशी संबंधित कायद्याची सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. गुन्हा घडला असता न भीता, तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी; मारहाण झाली असल्यास वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. गर्भजलपरीक्षा करून मुलीचा गर्भ असेल तर बेकायदा गर्भपात करणे गुन्हा आहे, त्याचबरोबर जन्म-मृत्यूची नोंद करणे, हंडा देण्या-घेण्यापासून दूर राहणे हेही महत्त्वाचे आहे.भारतीय संविधानातील स्त्रीविषयक तरतुदींनुसार मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे.बॅ. अर्चना मेढेकर-मराठे या कॅनडात जाऊन बॅरिस्टर झाल्या. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण स.भु. संस्था आणि कायद्याची पदवी माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय, औरंगाबाद येथून. महाविद्यालयीन काळात विविध स्पर्धांत प्रावीण्य. जिल्हा व उच्च न्यायालयात काही काळ काम. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून लिखाण. आकाशवाणीवर कार्यक्रम. नारी विकास प्रतिष्ठान, गरीब स्त्रियांसाठी मोफत कायदेशीर सल्ला.