उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Maharashtriyache Kavyaparikshane by S V Ketkar

Description

मराठी साहित्यनिर्मितीच्या प्रारंभकाळापासून ते पेशवाईच्या अखेरीपर्यंत निर्माण झालेल्या मराठी वाङ्‌मयाकडे पाहण्याचा एक अभिनव दृष्टिकोन डॉ. केतकरांनी येथे प्रकट केला आहे. महाराष्ट्रीय कवींनी (आणि वाचकांनी) जे काव्यपरीक्षण केले, त्याचे आणि त्यांतून त्यांची जी वाङ्‌मयाभिरुची प्रकट झाली, तिचे ऐतिहासिक विवेचन डॉ. केतकरांनी या ग्रंथामध्ये केले आहे. मराठी कवींची काव्यनिर्मितीमागील भूमिका,प्रेरणा, प्रयोजन हे संस्कृत काव्यनिर्मितीमागील भूमिका, प्रेरणा, प्रयोजन यांच्यापेक्षा कसे भिन्न होते ते येथे स्पष्ट होते. डॉ. केतकर म्हणजे माहितीचा ‘ज्ञानकोश’. वाचकांच्या रूढ समजुतींना धक्के देऊन त्यांना स्वतंत्र विचार करायला लावणे हे डॉ. केतकरांचे वैशिष्ट्य याही ग्रंथात दिसते.प्राचीन मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासाच्या ज्या अनेक दिशा या ग्रंथात डॉ. केतकरांनी दाखविल्या आहेत, त्या आजही मार्गदर्शक आहेत.
नियमित किंमत
Rs. 225.00
नियमित किंमत
Rs. 250.00
विक्री किंमत
Rs. 225.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Maharashtriyache Kavyaparikshane by S V Ketkar
Maharashtriyache Kavyaparikshane by S V Ketkar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल