नाशिक (नासिक) या नावामागचे रहस्य काय? शूर्पणखेचे नासिकाछेदन की वेगळेच काही? प्राचीनकाळी स्त्री-राज्ये होती काय? दधीची यांची अश्वशिरविद्या कोणती? पुष्पक विमान होते तरी कसे? ‘मामा-भांजा’ डोंगर म्हणजे काय? त्रिपुरासुर कोण होता? ही हिंगलाजदेवी कोण? कुठची? आणि कारानिदेवी? तुळशीच्या लग्नाची कहाणी दुखद?
या व अशा काही मिथाकांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न.
समाजमनाच्या भावना समजून घेतल्याशिवाय अशा मिथकांचा अर्थ शोधता येणार नाही. धर्म, समाज, आणि संस्कृती यांचे परस्परसंबंध शोधताना अशा मिथककथांचा अभ्यास करावाच लागतो.
सुकन्या आगाशे यांचे हे पुस्तक मिथककथांच्या अभ्यासकांना व या विषयाचे कुतूहल असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल.