"मध्यान्हीच्या मैफली" या कथा संग्रहाचं प्रकाशन आजचे आघाडीचे लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांच्या हस्ते मुंबईत एका छोटेखानी समारभात आज संपन्न झालं. प्रस्तुत 'मध्यान्हीच्या मैफली' या पुस्तकात संगीत जगतातल्या कलाकारांच्या आणि कलाकार होऊ पाहणाऱ्यांच्या जीवनात उद्भवणाऱ्या आंदोलनांचा कथारूपात संवेदनशीलपणे वेध घेतला आहे. सर्जक कलावंतामधला एक सामान्य माणूस आणि अलौकिकाचा वेध घेऊ पाहणारा असामान्य यांच्या मधलं द्वंद्व आणि त्यामुळे होणारी त्यांची फरफट यांचं वास्तव टिपण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकारचं हे कदाचित एकमेव पुस्तक असावं. म्हणूनच हे पुस्तक वाचकांना एक निराळा अनुभव देईल हे नक्की. हे पुस्तक संस्कार प्रकाशन या दर्जेदार प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आले आहे.