मधुमेहाचा प्रादुर्भाव आजकाल समाजाच्या सर्व थरांमध्ये मोठया प्रमाणात आढळतो. एकेकाळी तापदायक व्याधी वाटणार्या मधुमेहाचा मुकाबला वास्तविक सर्वांनाच सहजपणे, अगदी हसतखेळत करता येईल. परंतु त्यासाठी हवी मधुमेहाविषयी परिपूर्ण माहिती. मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेह-तज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी या पुस्तकात आवश्यक अशी माहिती पध्दतशीरपणे देऊन योग्य मार्गदर्शन केले आहे. मधुमेहावर काबू मिळविण्यासाठी हे पुस्तक जणू गुरुकिल्लीच आहे. अत्याधुनिक संशोधन व प्रयोग यावर आधारित अद्ययावत माहितीचा साठा, पुस्तकाची सोपी रचना, सुलभ भाषा यामुळे हे पुस्तक मधुमेह्यांनाच नव्हे, तर त्यांच्या ‘फॅमिलीला’ आणि ‘फॅमिली डॉक्टरांनाही’ एक वरदानच वाटले.