पोलंडच्या एका अतिसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मादाम क्यूरी विलक्षण प्रतिभावान, विदुषी आणि जगातील श्रेष्ठतम शास्त्रज्ञांपैकी एक होत्या.• भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारी प्रथम महिला• दुसरा नोबेल पुरस्कार मिळवणारी प्रथम विदुषी• फ्रान्समधील डॉक्टरेट मिळवणारी प्रथम महिला• सॉरबॉन विद्यापीठातील पहिली महिला प्रोफेसरअशी त्यांची ओळख सांगता येईल.असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या मेरी क्यूरी यांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. खुल्या, धोकादायक आणि असुविधाजनक शेडमध्ये अपुऱ्या उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी ‘रेडियम’चा अद्भुत असा शोध लावला. केवळ संशोधनातच नव्हे तर दान व सेवेतही त्या अग्रेसर असत.मादाम क्यूरी या एक महान शिक्षिकाही होत्या. त्यांनी अनेक विद्वान व्यक्तिमत्त्वं, शास्त्रज्ञ घडवले. आजच्या युवा पिढीने देखील विज्ञान व औद्योगिक क्षेत्रात अपूर्व योगदान देण्यासाठी आणि व संशोधनात नवे उच्चांक गाठण्यासाठी मादाम क्युरींचे चरित्र नक्कीच प्रेरणादायी ठरेल.