ही गोष्ट आहे जपानच्या एका फुलपाखरासारख्या नाजूक मदाम, च्यो-च्योची. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकी प्रभावातल्या जपानी वातावरणातलं हे कथाबीज. स्वयंभू, आत्मनिर्भर च्यो-च्यो कष्टाळू जपानी स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण.. एका अमेरिकी माणसासोबत ती प्रेमानं संसार थाटते. पण आयुष्यातले कष्ट कमी होण्याऐवजी तिच्या आयुष्यात नव्या प्रश्नांची भर पडते. जीवनातल्या चढउतारांना कणखरपणे सामोरं जाणारी च्यो च्यो ती सारी आव्हाने पेलते. पण या फुलपाखराला जणू दुर्दैवाचा शापच असतो. तिचा अमेरिकी नवरा पुन्हा नवं वादळ घेऊन तिच्या आयुष्यात येतो..आणि आयुष्याची घटी पुन्हा विस्कटते. आता मदाम बटरफ्लाय पुन्हा आशानिराशेच्या हिंदोळयावर भिरभिरू लागते..