प्रा. मोहन पाटील हे ग्रामीण साहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून सर्वपरिचित आहेत. सर्जनशील लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पुस्तकात प्रा. मोहन पाटील यांनी लोकसाहित्यशास्त्राचे तात्त्विक विवेचन केले आहे. लोकसाहित्याचा उपयोजित अभ्यास नोंदवतानाच त्यांनी काही लोककथा, लोकगीत प्रकारांसंबंधी चर्चा केली आहे. त्यामागे दडलेला समृद्ध अर्थही स्पष्ट केला आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.