आज लोकसाहित्याच्या अभ्यासाने वेग घेतला आहे, अभ्यासक्षेत्र विस्तारत असताना त्याला शास्त्रीय बैठक देणे आवश्यक आहे. यासाठी गरज आहे ती अभ्यासकांना
काही प्रशिक्षण देण्याची. ही गरज लक्षात घेऊन लोकसाहित्याचे श्रेष्ठ अभ्यासक डॉ. गंगाधर मोरजे
यांनी हा मौलिक ग्रंथ अभ्यासकांच्या हाती दिला आहे.
लोकसाहित्याचा क्षेत्रीय अभ्यास करताना अभ्यासकांना मार्गदर्शक ठरावे, त्यांच्या संशोधनकार्याला बळ मिळावे व मराठी लोकसाहित्याचा अभ्यास अधिक व्यापक व्हावा,
या हेतूने डॉ. मोरजे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
जिज्ञासूंनी याचा नक्की लाभ घ्यावा.