मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणेया पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.