‘लोहमित्र धातू जिंदाबाद!’ या पुस्तकात लेखकाने लोहपरिवारातील धातूंची ओळख लालित्यपूर्ण भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. हे वैज्ञानिक पुस्तक धातूशास्त्राची ओळख अत्यंत साध्या, सोप्या आणि ओघवत्या भाषेत करून देते. ते वैज्ञानिक असूनही कंटाळवाणे वा क्लिष्ट न वाटता रोचक वाटते. हे पुस्तक केवळ कुमारमित्रांना किंवा धातूशास्त्राचा अभ्यास करणार्यांनाच उपयोगी नाही; तर ज्यांना सभोतालचे जग जाणून घेण्याची नेहमीच उत्कंठा आहे, त्यांनाही हे उपयुक्त आहे. श्री. अरुण जाखडे यांनी विविध प्रयोगशाळांतून शोधक वृत्तीने काम केले आहे. विविध अग्रगण्य औद्योगिक समुहातील धातूशास्त्र विभागात दीर्घकाळ कार्यरत होते.