भारताच्या धार्मिक संस्कृतीच्या इतिहासात, इतिहासपूर्व कालापासून आजच्या विसाव्या शतकापर्यंत स्थिरावलेल्या शक्तिपूजेच्या एका घटकाचे, म्हणजे लैंगिक प्रतिकांचे अत्यंत मूलगामी असे संशोधन करणारे ‘लज्जागौरी ' हे पुस्तक आहे. अद्ययावत् संशोधित साधनांच्या आधारे आणि सर्व नव्या सामग्रीच्या प्रकाशात, विखुरलेल्या वा उत्खननांत सापडलेल्या प्रतिकांचा आणि मूर्तींचा अभ्यास करून सुसंगत असे मनन यात प्रसन्न शैलीने व्यक्त केले आहे. आदिवासी जमातींपासून ते अत्यंत सुसंस्कृत अशा भारतीय समाजातील लैंगिक शक्तिपूजेचे संदर्भ दाखवून यात विवेचन केलेले आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशातील लैंगिक शक्तिपूजेची प्रतीके वा मूर्ती यांचा संदर्भ अर्थपूर्ण रीतीने इथे उकलून दाखविलेला आहे.‘लज्जागौरी ' हे पुस्तक म्हणजे मातृपूजक संस्कृती व विशेषत: भारतातील देवीपूजापद्धती यांच्या अध्ययनाचे एक उत्कृष्ट साधन आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. आधुनिक मनोविश्लेषणशास्त्रातील सांस्कृतिक मानसशास्त्राच्या अध्ययनाला व संशोधनालाही याचा चांगला उपयोग होईल.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी